वांगणी घटना : मयुरच्या शौर्याचे CCTV फुटेज दडपण्याचा झाला होता प्रयत्न, अखेर…

वांगणी घटना : मयुरच्या शौर्याचे CCTV फुटेज दडपण्याचा झाला होता प्रयत्न, अखेर…

वांगणी स्टेशनला घडलेल्या मयुर शेळकेच्या शौऱ्याचे CCTV फुटेज दडपून ठेवण्याचा प्रयत्न रेल्वेमार्फत झाल्याची माहिती आता समोर येत आहे. या संपुर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळण्याएवजी मोबाईलवर काढलेले मॉनिटरचे फुटेज व्हायरल झाले होते. त्यामुळेच ओरिजनल सीसीटीव्ही फुटेज का मिळाले नाही ? याबाबतची चौकशी केल्यावर आता सत्य समोर आले आहे. त्या १३ सेकंदाच्या शौर्याच्या व्हिडिओचे सीसीटीव्ही फुटेज देण्यासाठी रेल्वेच्याच अधिकाऱ्यांनी नकार दिल्याची बाब आता समोर आला आहे. त्यामुळेच आता या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कामगार संघटनांमार्फत होत आहे. मयुरने मोबाईलवर काढलेल्या व्हिडिओचे कौतुक झाल्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी या शौऱ्याची दखल घेत असल्याचे आता उघड होत आहे.

याआधी १७ एप्रिलला रेल्वेत पॉईंट्समन म्हणून कार्यरत असणाऱ्या मयुर शेळकेने अतिशय शौर्य आणि धाडस दाखवत ट्रॅकवर पडलेल्या साहिल शिरसाटचा जीव वाचवला होता. मयुरने या घटनेबाबतचे सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. पण ज्यांच्याकडे घटनेबाबतचे सीसीटीव्ही फुटेज होते, त्यांनी मात्र मयुरला कोणतेही सहकार्य केले नाही. मयुरने साहिलचा जीव वाचवल्याचे चांगले काम मुख्यालयाला सांगा अशी विनंती केल्यानंतरही रेल्वेच्या अधिकारी वर्गाकडून कोणतेही सहकार्य मयुरला मिळाले नाही. सुरूवातीला मयुरने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मोबाईलवर काढले. ओरिजनल फुटेज मिळत नसल्यानेच मयुरने हे फुटेज मोबाईलवर काढून सोशल मिडियावर अपलोड केले. त्यानंतर हा व्हिडिओ अनेक वॉट्स एप ग्रुपवर आणि सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने या संपुर्ण घटनेची दखल घेतली. मयुरनेही हे सीसीटीव्ही फुटेज आपल्या अनेक मित्रांमध्ये व्हायरल केले होते. मयुरला अनेक ठिकाणाहून येणाऱ्या शुभेच्छांमुळे आणि मयुरचे प्रचंड झालेल्या कौतुकामुळेच रेल्वेला या संपुर्ण शौर्याची दखल घ्यावी लागली. त्यामुळेच रेल्वे कामगार संघटनेने या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. जर ही व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली नसती, तर जगाला कधीच या शौर्याची माहिती मिळाली नसती असा दावा रेल्वे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केला आहे.

एरव्ही रेल्वेच्या पोलिसांनी दाखवलेले धाडस हे अधिकृत व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात येते. पण हा व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर कधीच मयुर शेळकेचे शौर्य समोर आले नसते असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. म्हणून रेल्वे संघटनांनी या घटनेबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे दिली आहे. तसेच संपुर्ण घटनेची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. संपुर्ण रेल्वे विभाग हा एका कुटूंबासारखा आहे, त्यामुळेच अशा प्रकारची मानसिकता रेल्वे कर्मचाऱ्यांनी टाळायला हवी, असे मत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महासचिव वेणू नायर यांनी मिड डे या दैनिकाला दिली. तर मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनीही या घटनेबाबत चौकशी करत असल्याचे सांगितले.


 

First Published on: April 26, 2021 7:55 PM
Exit mobile version