विधान परिषदेचे सदस्य आर.एन. सिंह यांच निधन

विधान परिषदेचे सदस्य आर.एन. सिंह यांच निधन

विधान परिषदेचे सदस्य आर.एन. सिंह यांच निधन

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, भाजप नेते आर.एन सिंह यांच आज, रविवारी गोरखपूर येथील राहत्या घरी निधन झालं. माहितीनुसार, आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आर.एन सिंह यांनी अखेरचा घेतला. आर.एन.सिंह पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या हृदयाचे ऑपरेशन झाले होते.

१ जानेवारीला आर.एन सिंह यांनी आपला ७४वा जन्मदिवस साजरा केला होता. मुंबईतील सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या उत्तर भारतीय संघाचे ते सातव्यांदा अध्यक्ष झाले होते. ८ जुलै २०१६ मध्ये ते भाजपच्या तिकिटावर विधानपरिषदेवर निवडून गेले होते. ७ जुलै २०२२ रोजी त्यांच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ रोजी संपणार होता. मुंबईत राहणाऱ्या उत्तरप्रदेशमधील बांधवांसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले होते. मुंबई विद्यापीठामध्ये उत्तरप्रदेश भवनसाठी जमीन मिळावी, यासाठी त्यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवला होता. त्यांच्या निधनामुळे हिंदी भाषिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आर.एन.सिंह यांच्या निधनामुळे फक्त भाजपचेच नाही तर उत्तर भारतीय समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. गरिबीतून उभे राहून त्यांनी आपले साम्राज्य तयार केले होते. शेकडो लोकांना त्यांनी नोकरी दिली होती. आर.एन.सिंह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार गोरखपूरमध्ये होणार आहे. आर.एन. सिंह यांच्या निधनानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.

 

First Published on: January 2, 2022 9:54 PM
Exit mobile version