सोळा लाखांमध्ये मिळणार म्हाडाचं घर; दसऱ्याच्या मुहूर्तावर लॉटरी

सोळा लाखांमध्ये मिळणार म्हाडाचं घर; दसऱ्याच्या मुहूर्तावर लॉटरी

सोळा लाखांमध्ये मिळणार म्हाडाचं घर; दसऱ्याच्या मुहूर्तावर लॉटरी

घरांच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांना घर घेणं परवडत नाही आहे. मात्र, आता त्यांचं हे स्वप्न म्हाडा पूर्ण करणार आहे. म्हाडा दसऱ्याच्या मुहूर्तावर नऊ हजार घरांची लॉटरी काढणार आहे. या लॉटरीमधील घरांची किंमत १६ लाखांपासून सुरु होणार असून ४० लाखांपर्यंत असणार आहे. म्हाडाचं कोकण मंडळ ही लॉटरी काढणार आहे. यासंदर्भातील जाहीरात म्हाडा लवकरच काढणार आहे.

म्हाडाचे मुंबई आणि कोकण मंडळ दरवर्षी घरांची लॉटरी काढते. मात्र, गेली काही वर्ष कोरोना आणि इतर कारणांमुळे म्हाडाच्या घरांची लॉटरी निघत नव्हती. दरम्यान, आता कोकण मंडळ म्हाडाच्या घरांची लॉटरी काढणार आहे. तथापि, मुंबई मंडळ लॉटरी कधी काढणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे.

कुठे आणि घरांची किंमत काय असणार?

कोकण मंडळाच्या लॉटरीनुसार, वडवली येथे २०, कासारवडवली ३५० घरे अल्प उत्पन्न गटासाठी असून, या घरांची किंमत १६ लाखांच्या आसपास असेल. ठाण्यातील वर्तक नगर येथे अल्प उत्पन्न गटासाठी ६७ घरे असणार असून, या घरांचे क्षेत्रफळ ३२० चौरस फूट आहे. या घराची किंमत ३८ ते ४० लाखांच्या आसपास असेल. कल्याणमध्ये दोन हजार घरे अत्यल्प उत्पन्न गटाकरिता असून, या घराची किंमत १६ लाख असेल, असं म्हाडाने म्हटलं आहे.

विरार येथे १ हजार ३०० घरं असतील. यात एक हजार घरं अल्प आणि इतर घरं मध्यम उत्पन्न गटासाठी असतील. मिरा रोड येथे मध्यम उत्पन्न गटासाठी १९६ घरं असणार. ही घरे एक ते दोन बीएचके असतील. ठाण्यातील गोठेघर येथे तीनशे चौरस फुटांचे १,२०० घरं असणार असून, अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेली ही घरे १७ लाख रुपयांची असतील.

 

First Published on: July 28, 2021 10:30 AM
Exit mobile version