अजितदादांच्या घरातूनच अर्थसंकल्प फुटणार

अजितदादांच्या घरातूनच अर्थसंकल्प फुटणार

अजितदादांच्या मुलासाठी सरकारी जाहिरात

राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त आणि आरोग्य मंत्री अजितदादा यांच्यात घरातूनच अर्थसंकल्प फोडण्याचा प्रकार आज वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या जाहीरातींवरून झालेला आहे. अजित पवारांच्या मुलाच्या लिंकवरूनच थेट अर्थसंकल्पाचे प्रक्षेपण करणार असल्याची जाहिरात आज छापून आली आहे. मोबाईल, टॅब, डेस्कटॉप यावर लाईव्ह प्रक्षेपण हे www.parthlive.com वरून हे प्रक्षेपण होणार आहे. गेल्या वर्षी ट्विटर हॅण्डलचा वापर करून अर्थसंकल्प फोडण्यात आलेला असतानाच यंदाही असाच काहीसा प्रकार खाजगी लिंकवरून करण्यात आलेला आहे. एकूणच यंदाच्या अर्थसंकल्पाची धुरा यंदा पार्थच्या खांद्यावरच देण्यात आली आहे. महत्वाच म्हणजे राज्य सरककारच्या एका विभागानेच यासाठी वृत्तपत्रांमध्येही प्रसिद्धी दिली आहे.

DGIPR advt
पार्थ पवारच्या लिंकसाठी सरकारी जाहिरात
 
राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क संचलनालया (डीजीआयपीआर) च्या फेसबुक पेजवरूनही अर्थसंकल्पाचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. पण अर्थमंत्र्यांच्या मुलाच्या पेजवरून हे प्रक्षेपण प्रामुख्याने होणार असल्याचे जाहिरातून होणार असल्याचे दिसून येते. डीजीआयपीआरच्या लिंकच्या उल्लेखालाही अतिशय छोटी जागा देत यंदा पार्थ लाईव्हच्या माध्यमातूनच अर्थसंकल्प २०२०-२१ चे प्रक्षेपण होणार आहे. अकरा वाजल्यापासून विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पाच्या भाषणाला सुरूवात होईल. जाहिरातीच्या मुद्द्यावर डीजीआयपीआरचे महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. 
First Published on: March 6, 2020 10:49 AM
Exit mobile version