Milk Agitation LIVE: गरीब दूध उत्पादकाला न्याय मिळालाच पाहिजे – प्रवीण दरेकर

Milk Agitation LIVE: गरीब दूध उत्पादकाला न्याय मिळालाच पाहिजे – प्रवीण दरेकर

भाजप नेत्या चित्रा वाघ या अक्कलकोट येथे रास्तारोको आंदोलनात सहभागी झाल्या. दुधाला १० रूपये प्रती लीटर आणि दूध भुकटीला ५० रुपये प्रती किलो अनुदान मिळावे यासाठी तहसिलदारांना निवेदन दिले. यावेळी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष देशमुखजी तालुकाध्यक्ष मोतीरामजी व पदाधिकारी उपस्थित होते.


दूध आंदोलनात भाजपही अग्रेसर. मुंबईत जागोजागी आंदोलन सुरू असून यामध्ये भाजपचे  नेते मंगलप्रभात लोढा, विद्या ठाकूर आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलनात सहभाग दर्शवला आहे.


शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

१. प्रति लिटर दुधाला १० रुपये अनुदानाची मागणी.
२. ३० रुपये दुधाला हमी भाव द्या.
३. बाहेरुन आयात होणारी दुध पावडर बंद करा.


दूध उत्पादक संघर्ष समिती आणि किसानसभेच्यावतीने दूध दरवाढीबाबत जोरदार आंदोलन करण्यात आलं. शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी यावेळी गाई चावडीवर बांधून सरकारचा प्रतिकात्मक निषेध केला.


वेळ गेलेली नाही, सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यकर्त्यांच्या दारात आंदोलन : अजित नवले


पुण्यातील मावळ येथे दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आक्रमक, चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली नायगाव येथील शासकीय दूध संकलन केंद्राबाहेर आंदोलन


पंढरपूरमध्येही दूध दरवाढ आंदोलनाला सुरुवात, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वात चंद्रभागा नदीच्यापात्रात विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन


रयतक्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पंढरपुरात नामदेव पायरीजवळ प्रतिकात्मक आंदोलन, विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून सरकारचा निषेध


जालन्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी रयत क्रांती संघटनेचं आंदोलन, परतूर शहरात मारुतीला दूध अभिषेक करुन एल्गार आंदोलन, दुधाला १० रुपये दरवाढ मिळालीच पाहिजे, रयत क्रांती संघटनेचा विजय असो अशी घोषणाबाजी


औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या दूध आंदोलनाला भल्या सकाळी सुरुवात, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रतिकात्मक दगडांना दूध अभिषेक घालून आंदोलन, जिल्ह्यातील डोणगावातही दगडांना अभिषेक, शेतकऱ्यांकडून गावातील ग्रामदैवत गणपती बाप्पालाही दुग्धाभिषेक


बुलडाणामध्ये चिखलीत रयत क्रांती संघटनेचं दूध आंदोलन, चिखलीच्या मेहकर फाटावर दुधाचे टँकर अडवला, पहाटे ४ वाजल्यापासून कार्यकर्ते रस्त्यावर, दुधाची नासाडी न करता शेतकऱ्यांना शहरात जाण्यापासून अडवत माघारी पाठवले.


रयत संघटनेची दुधाला प्रतिलिटर १० रुपये आणि दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्याची मागणी, सरकारला सद्बुद्धी दे म्हणत मारोतीरायाला साकडे घातले


शेतकरी संपाचं नेतृत्व करणाऱ्या पुणतांबा गावात दूध दरवाढीसाठी आंदोलन, दूध उत्पादक शेतकरी, किसान क्रांती संघटना आणि मनसेचं संयुक्त आंदोलन, बळीराजाच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करत आंदोलन, सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, दुधाला प्रतिलिटर 30 रुपये देत उत्पादकांच्या खात्यात प्रतिलिटर १० रुपये अनुदानाची मागणी


दूध उत्पादक संघर्ष समिती आणि किसानसभेच्यावतीने दूध दरवाढीबाबत जोरदार आंदोलन करण्यात आले. शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडतानाही जोरदार घोषणाबाजीही केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी यावेळी गाई चावडीवर आणून बाधत सरकारचा प्रतिकात्मक निषेध केला. तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.


‘अकोल्यात प्रत्येक डेअरीवर शेतकरी एकत्र आले. त्यांनी दुधाचा अभिषेक घातला. जनावरं चावडीवर आणून बांधत सरकारचा निषेध केला. अजूनही वेळी गेलेली नाही, सरकारने शेतकऱ्यांचा तळतळाट आणि वेदना पाहू नये. तातडीने निर्णय घ्यावा. तसं झालं नाहीतर यापुढचं आंदोलन राज्यकर्त्यांच्या दारावर करावं लागेल,’ असाही इशारा अजित नवले यांनी दिला.


दुधाच्या खरेदी दर वाढवून मिळावा, त्यासाठी राज्य सरकारनं अनुदान द्यावं, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शेतकरी संघटनांसह भाजप आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा मोठा परिणाम दिसत आहे.

First Published on: August 1, 2020 4:09 PM
Exit mobile version