मंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतात केली भात पेरणी, व्हिडिओ झाला व्हायरल

मंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतात केली भात पेरणी, व्हिडिओ झाला व्हायरल

मंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतात केली भात पेरणी, व्हिडिओ झाला व्हायरल

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा शेतात भात पेरणी करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. शिवसेना नेते जनमानसातील नेते म्हणून ओळखले जातात. महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळगाव आहे. राजकारणात एकनाथ शिंदेंची वेगळी ओळख असली तरी शेतीच्या कामाशी त्यांची नाळ कायम जोडलेली आहे. काही दिवसांपुर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महाबळेश्वर दौऱ्यावर होते. राज्यात चांगलाच पाऊस पडल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शिंदे यांनी सुद्धा दरे गावात आपल्या शिवारात भात पेरणी करुन शेतात श्रमदान केलं आहे.

पावसाने हजेरी लावली असल्यामुळे बळीराजाने शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. भात पेरणीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरमधील कोरोना परिस्थिती, सातारा,वाई,खंडाळा, महाबळेश्वर भागातील लसीकरणाचा आढावा आणि इतर महत्त्वाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महाबळेश्वर दौरा केला होता. तेव्हा आपल्या दरे गावी एकनाथ शिंदे गेले होते. गावांत शेतीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड करतानाही एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर यावेळी शेतात भात पेरणी करताना एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ते शेतात भात पेरणी करताना दिसत आहेत. सोबतीच्या मंडळींचे मार्गदर्शनाने एकनाथ शिंदे पेरणी करत आहेत. तसेच आपण व्यवस्थित करत आहोत का? असा प्रश्नही शिंदे यांनी विचारला आहे. एकनाथ शिंदेंना शेतीची काम करण्यात प्रचंड रस आहे. त्यांना कामातून वेळ मिळेल तेव्हा गावी जाऊन शेतात काम करत असतात. एकनाथ शिंदे दरवर्षी शेतीतील काम करण्यासाठी गावी जातात. नोव्हेंबर २०२०मध्ये एकनाथ शिदे यांनी आपले मुळगाव असलेल्या दरेमध्ये कुटुंबीयांसह स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. यावेळी त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही त्यांच्यासोबत स्ट्रॉबेरी लागवडच्या कामात मदत करत होते. फोटोमध्ये एकनाथ शिंदे कुटुंबीयांसह स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड करताना दिसत आहेत.

First Published on: June 12, 2021 2:40 PM
Exit mobile version