समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश, राज्यमंत्र्यांचा मेगा प्रकल्पांचा आढावा

समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश, राज्यमंत्र्यांचा मेगा प्रकल्पांचा आढावा

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह अध्यक्ष आमि राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) संजय बनसोडे यांनी आज, शुक्रवारी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि इतर मेगा प्रकल्पाचा आढावा घेतला. प्रकल्पाच्या प्रगतीवर समाधान व्यक्त करत काम वेगवान रितीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

संजय बनसोडे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वांद्रे कार्यालयात आज, शुक्रवार ७ जानेवारी रोजी प्रकल्पांबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला सह-व्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) अनिल कुमार गायकवाड आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मिसिंग लिंक आणि ठाणे खाडी पूल-३ या प्रकल्पांचा आढावा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या बैठकीत घेतला. कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.


हेही वाचा – MHADA : पुण्यात अजित पवारांच्या हस्ते म्हाडाच्या ४ हजार २२ घरांची सोडत


 

First Published on: January 7, 2022 8:37 PM
Exit mobile version