उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली खातेवाटपाची वेळ

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली खातेवाटपाची वेळ

अजित पवार

महा विकास आघाडी प्रणीत ठाकरे सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. मात्र खातेवाटपाबाबत अद्याप काही ठरलेले नाही. मंत्रिमंडळात स्थान न दिलेल्या नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचे तीनही पक्षांचे प्रयत्न सुरु असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खातेवापट जाहीर करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आज मंत्रालयात चार तास बैठक घेतल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप केले जाणार आहे. कोणत्या मंत्र्यांकडे कोणते खाते द्यायचे याची चर्चा पुर्ण झालेली आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राहणार असून उद्यापर्यंत पालकमंत्री आणि खातेवाटप जाहीर होणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

खातेवाटप करण्यासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मंत्रालयात पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना बैठकीबाबत माहिती दिली. खातेवापटावरून महा विकास आघाडीत कोणतेही वाद नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. तसेच आजच्या बैठकीत पालकमंत्रीपदाबाबतही चर्चा झाली असून उद्यापर्यंत याची घोषणा होऊ शकते, असे अजित पवार म्हणाले.

First Published on: January 1, 2020 8:54 PM
Exit mobile version