महाराष्ट्राला स्वावलंबी बनविण्यासाठी ‘मिशन ऑक्सिजन’ मोहीम – मुख्यमंत्री

महाराष्ट्राला स्वावलंबी बनविण्यासाठी ‘मिशन ऑक्सिजन’ मोहीम – मुख्यमंत्री

कोविडविरुद्धच्या या लढाईमध्ये अनेक डॉक्टरांनी आपले प्राण देखील गमावले

सध्या महाराष्ट्रात १८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असून यापैकी १२९५ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती महाराष्ट्रात होत आहे. सुमारे ५०० मेट्रिक टन आपणास इतर राज्य व केंद्र शासनाच्या मदतीन उपलब्ध होत आहे. सद्य स्थितीत असलेल्या ३८. PSA प्लांटस मार्गात ५३ मेट्रिक टन ची निर्मिती होत आहे. तसेच अल्पकाळातील आवश्यकतेचा विचार करता, महाराष्ट्र स्वावलंबी होण्यासाठी राज्यात सुमारे ३८२ अतिरिक्त PSA प्लांटसची स्थापना करण्यात येत आहे. त्यातून जवळपास २४० मेट्रिक टन ची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू असून सर्व प्लांटस जून अखेरील सक्रिय होतील. या उपक्रमामुळे राज्यातील हॉस्पिटल्स ऑक्सिजनबाबत स्वावलंबी होतील. भविष्यातील ऑक्सिजनच्या आवश्यकतेचा दीर्घकालावधीत विचार करता, विभागीय स्तरावर शासनामार्फत लिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मितीकरता अतिरिक्त प्लॉटस ची स्थापना करण्यात येणार आहे. परिणामी राज्यात दर दिवशी अतिरिक्त ३०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे.

शासन तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व विभाग स्तरावर ऑक्सिजन साठवणीचे विकेंद्रीकरण सुद्धा करीत आहे. विभागीय स्तरावर ७५० मेट्रिक टन आणि जिल्हा स्तरावर ३०० मेट्रिक टन साठवण क्षमता तयार केली जाईल. तसेच स्थानिक उद्योजकांच्या मदतीने ६०० मे.टन अतिरिक्त साठवण क्षमता तयार होऊ शकेल. सध्याच्या १६०० मेट्रिक टन साठवण क्षमतेनंतर ही महाराष्ट्राची साठवण क्षमता ३२५० मेट्रिक टन होईल. या साठवण क्षमतेच्या विकेंद्रिकारणामुळे वाहतुकीची आवश्यकता कमी होईल आणि ऑक्सिजनचे अखंड वितरण होईल.

रुग्णालयांमध्ये पुरेशी ऑक्सिजन क्षमता देण्याच्या उद्देशाने पूर्वतयारी म्हणून शासन अन्य योजनांचाही विचार करीत आहे. याशिवाय “ऑक्सिजन ऑन व्हील्स” सारख्या प्रारुपंचा ही शासन विचार करीत आहे ज्यामुळे रूग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचू शकेल.


हेही वाचा – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राला आणि राष्ट्रपतींना जोडले हात

 

 

 

First Published on: May 5, 2021 9:16 PM
Exit mobile version