संतप्त शेतकऱ्यांनी आमदार बोरसेंना कोंडले

संतप्त शेतकऱ्यांनी आमदार बोरसेंना कोंडले

सटाणा तालुक्यातील केरसाणे गावातील संतप्त शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बोरसे यांना कोंडल्याचा प्रकार पुढे आला आहे. थकीत वीजबिलांमुळे महावितरणकडून खंडीत केला जाणारा विद्युत पुरवठा, गेल्या दोन दिवसांत बेमोसमी पावसाने झालेले नुकसान यामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. शासनाकडून कोणतीही मदत केली जात नसल्याने, शेतकऱ्यांनी आमदार बोरसे यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून संतापाला वाट मोकळी करून दिली.

First Published on: March 24, 2021 3:01 PM
Exit mobile version