आमदार जयकुमार गोरे यांचा राजीनामा सुपूर्द

आमदार जयकुमार गोरे यांचा राजीनामा सुपूर्द

जयकुमार गोरे

माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज, शुक्रवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी साताऱ्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत हेदेखील उपस्थित होते.

जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया –

मी दोन टर्म आमदार राहिलो आहे. या वेळात मी माझ्या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यात मला काही यशही आले. पुराचा मोठा फटका माझ्या मतदार संघाला बसला. सध्या टँकरने आलेलेले पाणी आम्ही वापरत आहोत. तर चाराचावणीत लोकं राहत आहेत. त्यामुळे माझ्या मतदार संघातील पाण्या-शेतीचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी जो निर्णय मला घ्यावा लागेल तो घेईन, अशी मानसिकता माझी झालेली आहे. माझ्या आमदारकीचा मी राजीनामा दिला आहे. लवकरच मी पुढचा निर्णय घेईन. काँग्रेस पक्ष खूप मोठा आहे. माझ्या जाण्याने किंवा राहण्याने काँग्रेसला काहीही फरक पडत नाही. पण मी एकलव्याप्रमाणे नेत्यांवर प्रेम करत राहिलो. मी काँग्रेसशी देखील आतापर्यंत एकनिष्ठ राहिलो होतो. नुकताच ६४ गावांना पाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला आहे. लोकसभेला देखील माझी भूमिका स्पष्ट केली होती. ज्यांना वाटत होतं माढ्यात कधी राष्ट्रवादीचा सूर्य अस्त होणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. रणजित नाईक निंबाळकर हे निवडून आले. भाजपात प्रवेश कधी करायचा हे कार्यकर्ते आणि कुटुंबाशी बोलून लवकर ठरवेन.
– जयकुमार गोरे, माजी आमदार, काँग्रेस

First Published on: August 30, 2019 7:00 PM
Exit mobile version