पडळकरांनी इथून पुढे बोलताना काळजी घ्यावी, आमदार निलेश लंकेंचा इशारा

पडळकरांनी इथून पुढे बोलताना काळजी घ्यावी, आमदार निलेश लंकेंचा इशारा

पडळकरांनी इथून पुढे बोलताना काळजी घ्यावी, आमदार निलेश लंकेंचा इशारा

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापूरमध्ये दगडफेक झाली. या वेळी पडळकर गाडीमध्येच होते. या हल्ल्याचं खापर पडळरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडलं आहे. पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार निलेश लंके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गोपीचंद पडळकरांचे वक्तव्य चुकलं परंतु इथून पुढे बोलताना त्यांनी काळजी घ्यावी असं वक्तव्य खपवून घेणार नाही असा घणाघात निलेश लंके यांनी केला आहे. दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी गाडीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत राष्ट्रवादीवर हल्ला केला आहे.

आमदार निलेश लंके यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राची भूमी महिलांचा मानसन्मान करणारी भूमी आहे. शरद पवार देशातील सुसंस्कृत नेते आहेत. त्यांच्याबाबत अशा शब्दात बोलणं १०० टक्के चुकीचं आहे. अशा प्रकारे वक्तव्य करणं एखाद्या लोकप्रतिनीधीला शोभा देत नाही. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. तसेच पडळकर यांनी इथून पुढे बोलताना काळजी घ्यावी अन्यथा अशी वक्तव्य खपवून घेणार नाही. अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे.

गोळ्या घातल्या तरी शांत बसणार नाही

पडळकर यांनी म्हणाले की, पमागील काही दिवसांपासून राज्यभर गोरगरीबांच्या बाजूने बोलत आहे. त्यांची बाजू मांडत आहे. प्रस्थापितांच्या विरोधात जाहीरपणे बाजू मांडल्यामुळे त्यांना आवडले नसेल. ते जे सगळे गप्पा मारतात लोकशाहीचे, फुले-शाहू आंबेडकरांचे त्यांच हेच उत्तर आहे का? अशा पद्धतीने उत्तर द्यायचे आहे का? वैचारिक लढाई आहे तर विचाराने चाला असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. अनेक विषयांवर भाष्य करत आहे परंतु ते त्या विषयांवर बोलत नाही. अशा पद्धतीने जर उत्तर देणार असतील तर निश्चितपणे गप्प बसणार नाही. उद्या गोळ्या जरी घातल्या तरी गप्प बसणार नाही माझी भूमिका मांडत राहणार अशी रोखठोक भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडली आहे.

शरद पवारांवर विखारी टीका

भाजप आमदार सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. शरद पवार यांच्याबाबत गोपीचंद पडळकर यांनी खासच्या शब्दात टीका केली होती. रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात अशी टीका केल्यामुळे राष्ट्रवादीमधील नेत्यांनी पवारांवर निशाणा साधला होता. शरद पवार वारंवार पवार कुटूंबियांवर टिक करत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही पडळकरांविरोधात रोष निर्माण झाला आहे.

First Published on: July 1, 2021 2:50 PM
Exit mobile version