Coronavirus: आमदार निलेश लंके यांनी केली औषध फवारणी

Coronavirus: आमदार निलेश लंके यांनी केली औषध फवारणी

आमदार निलेश लंके

करोनाविषयीचा आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेताघेता मतदारसंघातील गावांना भेट देत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी चक्क चास गावातील चौकात उतरून औषध फवारणी केली. आमदारांनी अस्वच्छतेच्या ठिकाणी फवारणी करत करोनावर मात करण्यासाठी स्वच्छतेकडे जाण्याचा मंत्र येथील ग्रामस्थांना दिला. करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन झाले असतानाही आमदार लंके यांनी घरात न बसता पारनेर-नगर मतदारसंघातील जनतेला दिलासा देण्याचे काम सुरूच ठेवले आहे. करोनामुळे सक्तीची वीजबिल वसूली थांबवावी, कर्ज वसूलीस तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीसाठी वाहनांना परवानगी देण्यात यावी. या मागण्यांसाठी त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. यातील काही मागण्यांना यशही मिळाले आहे.

गावातील वैद्यकीय सुविधांची घेताहेत माहिती

आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधत त्यांच्या बैठका घेवून लंके मतदार संघातील परिस्थितीचा दिवसातून अनेकवेळा आढावा घेत आहेत. प्रमुख गावांमधील ग्रामपंचायतीत बैठका घेवून तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देवून वैद्यकीय त्यांनी तेथील सुविधांची माहिती घेतली. मतदारसंघातील नागरीकांना दिलासा देतानाच लंके यांनी स्वत: हातात फवारणी यंत्र घेवून चौक फवारणी देखील केली. करोनाला हद्दपार करण्यासाठी नागरीकांनी सरकारी निर्बंधाचे पालन करत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा – भारतात करोनाग्रस्तांची संख्या ८३४, तर १९ जणांचा मृत्यू

राज्यासाठी चिंतेची बाब 

देशात करोनापासून मुक्तता मिळवण्यसाठी लॉकडउन जाहीर केले आहे. तर दुसरीकडे करोग्रस्त रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज महाराष्ट्रात करोनाचे सहा रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात करोनाचा आकडा १७७ वर गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात करोनाची संख्या १५९ वर होती. मात्र, आता ही संख्या वाढली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मुंबईत आज सकाळी पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या १५९ वरुन १७७ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र, असे असताना देखील करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने राज्याची चिंता वाढली आहे.

First Published on: March 28, 2020 3:47 PM
Exit mobile version