मनसैनिकांनो तुम्ही साथ द्या, सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी माझी; राज ठाकरे

मनसैनिकांनो तुम्ही साथ द्या, सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी माझी; राज ठाकरे

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे सध्या चार दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अमरावतीमध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी राज्यातील सध्याची राजकीय परिस्थितीवर पडखड मत मांडत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. तडजोडीतून मिळालेली सत्ता ही क्षणभंगुर असते. त्यामुळे तुम्ही मला साथ द्या. आपण पक्ष उभा करून सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी.. असा विश्वास राज ठाकरेंनी दिला आहे.

राज ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर असून या भागात ते मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहे. विदर्भात एकेकाळी भाजपची सत्ता होती मात्र आता भाजपने याठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केलेय, यामुळे राज ठाकरेंनी आता विदर्भात मनसेचा विस्तार वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून राज ठाकरेंनी विदर्भातील 3 जिल्ह्यांचा दौरा केला आहे. राज ठाकरे हे नागपूर, चंद्रपूरनंतर आज अमरावतीमध्ये दाखल झाले. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधिताना त्यांनी मोलाचे सल्ले दिले आहेत.

तडजोडीतून मिळालेली सत्ता ही क्षणभंगुर

राज ठाकरे म्हणाले की, मनसे कार्यकर्त्यांनो फक्त सेल्फी काढून ते सोशल मीडियावर अपलोड करुन काहीही होणार नाही. सातत्याने काम करावे लागले. लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न, समस्या समजून घ्याव्या लागतील आणि ते सोडवण्यास प्राधान्य दिले पाहिजे.त्यातूनच शाश्वत आणि स्थिर सत्ता मिळवण्यापर्यंतचा प्रवास आपण करु शकतो. तडजोडीतून मिळालेली सत्ता ही क्षणभंगुर असते. त्यामुळे तुम्ही मला साथ द्या. आपण पक्ष उभा करून सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी असा विश्वास राज ठाकरेंनी दिला आहे.

कष्ट उपसल्याशिवाय सत्ता नाही

काम, शिस्त, सातत्य यातून सत्ता मिळते. 1995 साली डॉ. हेगडेवार यांनी संघाची स्थापना केली, पुढे जनसंघाने निवडणूक लढवण्यास सुरुवात केली. कधी एक, कधी दोन तर कधी तीन अशा अनेक अडचणींचा सामना करत जनसंघ काम करत राहिला, पुढे या संघाचे रुपांतर भारतीय जनता पक्षात झाले, कायम विरोधात असणाऱ्या भाजपने काम करणे सोडलं नाही. तब्बल चार पिढ्यांनंतर आज त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले. त्यांनी सातत्याने आंदोलने केली, खस्ता खाल्ल्या त्यामुळे त्यांनी हे यश मिळाले, कष्ट उपसल्याशिवाय सत्ता मिळत नाही. असही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांची वागणूक आणि समाजातील प्रतिमा स्वच्छ असायला हवी. यासाठी भविष्यात मास्टर प्लॅन तयार करुन प्रत्येक कार्यकर्त्याला प्रशिक्षण देण्याचे नियोजन सुरु असल्याची माहितीही राज ठाकरेंनी दिली आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर; पवारांनी फेटाळला भाजपचा दावा

First Published on: September 21, 2022 6:37 PM
Exit mobile version