‘स्वार्थासाठी अन् पैशासाठी…’; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका

‘स्वार्थासाठी अन् पैशासाठी…’; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका

स्वतःच्या स्वार्थासाठी अन् पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि कोपऱ्यात जाऊन बसायचं. असले धंदे मी नाही करत, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानात गटाध्यक्ष मेळाव्यात बोलताना विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली.

राज्यातील राजकारणावर राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरलवली, आता फिरताहेत सगळीकडे. यांच्यासारखा वागणारा मी नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी अन् पैशांसाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि कोपऱ्यात जाऊन बसायचं, असले धंदे मी नाही करत”, असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

“हि लोक करणार काहीच नाही. मराठीच्या किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेल. या उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कारण कधी भूमिकाच घेतली नाही. फक्त पैशांसाठी आणि स्वार्थासाठी कधी हा कधी तो. पण मला सत्तेत बसवा. पाकिस्तानी कलावंत जेव्हा इकडे होते. तेव्हा आपल्याच महाराष्ट्र सैनिकांनी हकलवले होते. म्हणे राज ठाकरे हिंदुत्ववादी झाले. अरे एका मराठी आणि कट्टर हिंदुत्ववादी घराण्यामध्ये जन्म झालाय माझा. परत कधीच पाकिस्तानी कलावंत भारतात आले नाही”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

याशिवाय, “काल परवा पर्यंत मुख्यमंत्री पदावर असलेले आणि आता बाहेर पडेलेल, मुख्यमंत्री पदावर असाताना तब्येतीचं कारण सांगून… असं म्हणतं राज ठाकरेंनी मान डोलावत उद्धव ठाकरेंची नक्कल करून दाखवली.

First Published on: November 27, 2022 8:07 PM
Exit mobile version