‘असा’ आहे राज ठाकरेंचा विदर्भ दौरा!

‘असा’ आहे राज ठाकरेंचा विदर्भ दौरा!

MNS chief Raj Thackeray ( File Photo )

सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असून, याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेसुद्धा विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. १७ ते २६ ऑक्टोबर या काळात राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर जाणार असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका करणाऱ्या राज यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचच लक्ष लागून राहिलं आहे. काँग्रेसच्या ‘भारत बंद’ला मनसेने पाठिंबा दिल्यानंतर आता आगामी निवडणुकीत मनसे आघाडीसोबत जाणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. या चर्चेमुळे देखील राज यांच्या विदर्भ दौऱ्याला विशेष फार महत्त्व प्राप्त झालं आहे. सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या तनुश्री दत्ता प्रकरणामुळेही चर्चेत आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यासोबत राज ठाकरे आणि मनसे पक्षावरही आरोप लावले आहेत. ‘राज ठाकरे नालायक आहेत’ असं वादग्रस्त वक्तव्य तनुश्रीने केलं आहे. मात्र, राज ठाकरेंनी याप्रकरणी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाहीये.

असा असेल राज ठाकरेंचा दौरा

येत्या १७ ऑक्टोबरला राज ठाकरे अमरावती शहरात आंबा महोत्सवाला उपस्थित राहतील. त्यानंतर अकोला, यवतमाळ बुलडाण्यासह राज ठाकरे विदर्भातील इतर भागात जाणार आहेत.  तसंच या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. राज ठाकरेंची जाहीर सभा म्हटलं की ती ऐकण्याची उत्सुकता  प्रत्येकालाच असते. त्यामुळे विदर्भ दौऱ्यादरम्यान काही ठिकाणी राज ठाकरेंच्या जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. आता या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे काय हालचाली करणार? तसंच जाहीर सभेमध्ये कोणत्या नव्या घोषणा करणार? विरोधकांचा समाचार घेणार का? याकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही लक्ष लागले आहे.


वाचा: राज ठाकरे नालायक आहे – तनुश्री दत्ता

First Published on: October 3, 2018 12:33 PM
Exit mobile version