पूरग्रस्त कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना सरकारने २ हजार कोटी बिनव्याजी कर्ज द्यावे, मनसेची मागणी

पूरग्रस्त कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना सरकारने २ हजार कोटी बिनव्याजी कर्ज द्यावे, मनसेची मागणी

पूरग्रस्त कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना सरकारने २ हजार कोटी बिनव्याजी कर्ज द्यावे, मनसेची मागणी

राज्यात अतिवृष्टीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. सांगली, कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थितीमुळे मोठं संकट निर्माण झालं आहे. या नूकसानग्रस्त नागरिकांना राज्य सरकारने २ हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज द्यावे अशी मागमी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती आधीच खालावली आहे. आता नैसर्गिक आपत्ती, पूरपरिस्थितीमुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचे मोठं नुकसान झाले आहे. कोरोना काळातही नागरिकांना मदत करण्याबाबत तसेच दोन लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारने नुकसानग्रस्त नागरिकांना मोठी मदत करावी अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे कोकणी व पश्चिम महाराष्ट्रातील बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे, सरकारने कमीत कमी २००० कोटी बिनव्याजी द्यावे. जसे हे बांधव यातून उभारी घेतील ते ह्या कर्जाची परतफेड स्वतःहून करतील हे नक्की. लोकप्रतिनिधींना गाडी साठी ३० लाख प्रत्येकी बिनव्याजी पैसे देणाऱ्या सरकारने आपल्या माणसासाठी एवढे करणे गरजेचे आहे. असे बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

भाजपसोबत युती नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची नाशिकच्या दौऱ्यादरम्यान भेट झाली होती. या भेटीनंतर मनसे-भाजप युतीची चर्चा रंगू लागली होती. परंतू मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. यामुळे मनसे-भाजपची युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे नाशिक दौऱ्यावर असून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत.

First Published on: July 28, 2021 4:19 PM
Exit mobile version