राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल; धमकीच्या पत्रानंतर बाळा नांदगावकर यांचा सरकारला इशारा

राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल; धमकीच्या पत्रानंतर बाळा नांदगावकर यांचा सरकारला इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेते ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं असल्याचं बाळा नांदगावकरांनी सांगितलं. या धमकीच्या पत्राबाबत बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे यांची भेट घेतली. मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त वाडके यांची भेट घेतली. तसंच, या पत्रात राज ठाकरे यांनाही धमकी देण्यात आली आहे. यावर “हे पत्र कोणी लिहलं, कुठून आलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही. माझं ठिक आहे, पण राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल” असं त्यांनी सांगितलं.

“आज सकाळी राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे यांची भेट घेतली. मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त वाडके यांची भेट घेतली. तीन चार दिवसांपूर्वी माझ्या लालबागच्या कार्यालयमध्ये मला धमकीचं थेट पत्र आलेलं आहे. हा भोंग्याचा विषय झाल्यापासून अशाप्रकारचे थ्रेड चालू आहेत. त्यातलच हे एक पत्र होतं. या पत्रात मला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहेच, सोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. ही जीवे मारण्याची धमकी असल्यामुळे मी साहेबांना काल ते पत्र दाखवलं. त्यानंतर संध्याकाळी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना ते पत्र दिलं. यावर आता पुढे काय कारवाई करणार ते पाहू.”

“हे पत्र कोणाकडून आलेलं आहे याची मला कल्पना नाही. पण ते पोस्टामधून आलेलं पत्र आहे आणि ते माझ्या कार्यालयात भेटलेलं आहे. यासंदर्भात गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी याबाबत चर्चा करतो. त्यानुसार त्यांनी चर्चाही केली. आणि पत्राबाबत काय कारवाई करायची असेल की कारवाई ते करतील. ‘पण मी एवढंच सांगू इच्छितो की बाळा नांदगावकर ठीक आहे, पण राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य सरकारने द्यावी’. पण वारंवार मी राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागतोय याची राज्य आणि केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी.”

“हे हिंदी पत्र असून त्यामध्ये अजानबाबत लिहीण्यात आलंय. तसंच, काही उर्दू शब्दही लिहिले आहेत.”

“भोग्यांचा विषय हा सामजिक आहे, आम्हाला हा धार्मिक विषय वाटत नाही. त्या विषयाचा सुपूर्ण महाराष्ट्रातीलच नवे तर देशभरातील जनतेला त्रास आहे. देशपरदेशात यासंदर्भात काय वातावरण निर्माण झालं आहे. हा सामाजिक विषय असल्याचं आम्ही वारंवार सांगतोय. सरकारनी हा विषय गांभीर्याने घ्यायला पाहिजे.”

त्यांनी त्यांचे काम केलं आम्ही आमचे काम करणार

राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असून त्यांच्या दौऱ्याला उत्तरप्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह विरोध करत आहे. 2008 साली राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय नागरिकांवर केलेल्या हाणामारीबाबत त्यांनी माफी मागावी अशी मागणी करत आहेत. तसंच, त्यांनी माफी नाही मागितली तर, त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असं त्यांनी काल काढलेल्या रॅलीदरम्यान म्हटलं. यावरही मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्यांनी त्यांचे काम केलं आम्ही आमचे काम करणार’ असं त्यांनी सांगितलं.


हेही वाचा – शिवसेनेच्या सभेत राज ठाकरेंच्या सभेची दृश्य–मनसेचा आरोप

First Published on: May 11, 2022 1:59 PM
Exit mobile version