‘लोकांना नोकरी आहे की नाही? लॉकडाऊन किती काळ चालणार?’

‘लोकांना नोकरी आहे की नाही? लॉकडाऊन किती काळ चालणार?’

राज ठाकरे

‘कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सुरुवातीच्या काळात कोणाला कोरोनाच्या संकटाचा अंदाज नव्हता. परंतु, आज जेव्हा आकडेवारी पाहतो तेव्हा परिस्थिती समजते. मात्र, आपल्याकडे लॉकडाऊन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही. आपण आता लॉकडाऊन किती काळ चालवणार आहोत. लोकांना आपली नोकरी आहे?, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’, या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॉकडाऊ आणि अनलॉकवर टीका केली आहे.

‘आपल्याकडे पोलीस प्रशासन, वैद्यकीय प्रशासन आणि अत्यावश्यक सेवीतील सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात खूपच चांगले काम केले असून अजूनही ते उत्तम काम करत आहेत. मात्र, सध्याची कोरोनाबाधितांची संख्यापाहून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही लोकांचा यात मृत्यू झाला हे दुर्देव म्हणायचं. आपण लॉकडाउन वगैरे किती काळ चालवणार आहोत. आज लोकांकडे आपलं काम आहे की नाही ही शंका आहे. पुण्यात तर दुकानं विक्रीला ठेवलेल्याचं फोटोही मी पाहिले आहेत,” असं राज ठाकरे म्हणाले.

अनलॉक कधी करणार?

काही दिवसांपूर्वी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मी एक प्रश्न उपस्थित केला होता की, अनलॉक कधी करणार? त्याचे उत्तर आतापर्यंत मिळालेले नाही. सरकारने नियमांप्रमाणे दुकाने सहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास सांगितली आहेत. मात्र, काही लोक वर्क फ्रॉर्म करण्यासाठी सकाळी बसतात ती संध्याकाळी उठतात. तर मग त्यांनी सामान घ्यायला कधी जावे? एक दिवस एका फुटपाथवरची दुकानं सुरू ठेवायची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणची उघडी ठेवायची. लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,’ असंही त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – दूध आंदोलन : १ ऑगस्ट रोजी दूध उत्पादकांचा राज्यव्यापी एल्गार!


 

First Published on: July 31, 2020 10:42 AM
Exit mobile version