मनसेच्या सदस्य नोंदणीला उदंड प्रतिसाद; सर्व्हर झाला डाऊन

मनसेच्या सदस्य नोंदणीला उदंड प्रतिसाद; सर्व्हर झाला डाऊन

मनसेच्या सदस्य नोंदणीला उदंड प्रतिसाद; सर्व्हर झाला डाऊन

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसेने सदस्य नोंदणी अभियान सुरु केलं आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित रविवारी नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला. कोविड-१९ संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी डिजिटल माध्यमातून नोंदणी अभियान केलं जात आहे. या सदस्य नोंदणीला उदंड प्रतिसाद येत आहे. यामुळे आता सर्व्हर देखील डाऊन झालं आहे.

मनसेचा प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी एक लिंक जनरेट करण्यात आली आहे. मात्र, आज त्या लिंकवर क्लिक केल्यावर ‘सदस्य नोंदणीला आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद! थोड्याच वेळात पुन्हा भेटू.” असं दिसत आहे. उदंड प्रतिसादामुळे सर्व्हर डाऊन झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यावर काम सुरु आहे. लवकरच पुन्हा एकदा सदस्य नोंदणी सुरु होईल.

सदस्य होण्यासाठी तीन पर्याय

रविवारपासून सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. सदस्य होण्यासाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. मोबाईल वर स्कॅन करून, संकेत स्थळावर जाऊन किंवा जाहिरातीत दिलेल्या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल देऊन नागरिकांना मनसेचे सदस्य होता येणार आहे.

अरे बघताय काय सामील व्हा

मनसेने १५ वर्षाच्या राजकीय वाटचालीत सदस्य नोंदणी करण्यासाठी पहिल्यांदाच वृत्तपत्रात जाहिरात दिली. आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये मुखपृष्ठावर मनसेच्या सदस्य नोंदणीची आज जाहिरात आहे. अरे बघताय काय सामिल व्हा, असं म्हणत मनसेने तमाम मराठीजनांना साद घातली आहे.

 

First Published on: March 15, 2021 10:27 AM
Exit mobile version