आम्ही ‘धन’से कमी, पण ‘मनसे’ लई आहोत; मनसेच्या राजू पाटलांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आम्ही ‘धन’से कमी, पण ‘मनसे’ लई आहोत; मनसेच्या राजू पाटलांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा ज्यांना विधीमंडळात निवडून आणता येत नाही त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं?, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेवर केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही ‘धन’ से कमी आहोत, पण ‘मनसे’ लई आहोत’, अशा शब्दांत राजू पाटील यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. (MNS mla raju patil slams ncp chief sharad pawar)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जोरदार टोला लगावला. साधारणपणे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा ज्यांना विधीमंडळात (आमदार) निवडून आणता येत नाही त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं?, असं शरद पवार म्हणाले होते. आता मनसे आमदार राजू पाटील यांनी पवारांच्या या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘आम्ही ‘धन’ से कमी आहोत, पण ‘मनसे’ लई आहोत, असं राजू पाटील म्हणाले. त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीत आता येत्या काळात कलगीतुरा पाहायला मिळत आहे.

बुधवारी शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पवारांनी मनसेवर निशाणा साधला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवारांसोबतची शिवसेना ही राष्ट्रवादीच्या प्राणी संग्रहालयातील प्राणी आहे, अशी टीका मनसेकडून करण्यात आली होती. मनसेच्या याच टीकेला शरद पवारांनी प्रत्यत्तर दिले. त्यावेळी मी प्राणी वगैरे संदर्भातील उल्लेख करणार नाही. मात्र साधारणपणे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा ज्यांना विधीमंडळात निवडून आणता येत नाही त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं?, असा टोला शरद पवार यांनी मनसेला लगावला.

शरद पवारांच्या याच टीकेवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा बोटं तोंडात घालाल, संधी सर्वांना मिळते, असा हॅशटॅगही त्यांनी वापरत शरद पवार यांना ‘आदर देतोय, आदर घ्या”, असेही राजू पाटील यांनी म्हटले.


हेही वाचा – शिवतीर्थसाठी शिंदे गट आग्रही, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली मध्यस्थ याचिका

First Published on: September 22, 2022 3:56 PM
Exit mobile version