महिला सुरक्षेसाठी मनसेचे महिला रक्षाबंधन स्कॉड

महिला सुरक्षेसाठी मनसेचे महिला रक्षाबंधन स्कॉड

मनसेचे महाअधिवेशन गोरेगाव येथे सुरू असून, मनसेने काही महत्वाचे ठराव देखील मांडले असून, आता महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी मनसेने रक्षाबंधन स्कॉड तयार करणार असून, पीडित महिलाना न्याय देण्याचे काम या मार्फत केले जाणार असल्याची माहिती मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी आपल्या अनुमोदनात सांगितले. मनसेच्या ठरावामध्ये स्वच्छ महिला – महिला अधिकार हा ठराव मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी मांडला. त्याला रुपाली पाटील आणि रिटा गुप्तां यांनी अनुमोदन दिले.

काय असेल महिला रक्षाबंधन स्कॉडमध्ये –

महिलांवरीलअत्याचार रोखण्यासाठी मनसेने हा महिला रक्षाबंधन स्कॉड सुरू केला असून, याच्या माध्यमातून राज्यातील पीडित महिलांना सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे. तसेच या माध्यमातून महिलांना कायदेशीर देखील मदत केली जाणार आहे असे रुपाली पाटील यांनी सांगितले.

महिलांसाठी मनसेचा विशेष ठराव –

दरम्यान मनसेने महिलांसाठी स्वच्छ महिला – महिला अधिकार हा ठराव मांडला असून, यामध्ये
महिला रक्षाबंधन स्कॉड,अस्मिता योजना, महिलांना समान काम समान वेतन कायदा, जेंडर बजेट आणि कॅन्सर आजाराबाबत महिलांमध्ये जनजागृती करणे हे मांडले आहे.

First Published on: January 23, 2020 2:27 PM
Exit mobile version