अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीचा समन्स

अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीचा समन्स

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीने समन्स बजावला आहे. उद्या सकाळी ११ वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र याचिकेवर हायकोर्टाने आपला निकाल राखून ठेवलेला आहे. या प्रकरणी सध्या ईडी आणि कार्निवल आयोगाकडूनही चौकशी सुरु आहे.

यावर अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी सांगितले की, तपास यंत्रणांकडून याप्रकरणी आपआपल्या परिने तपास सुरु आहे. मात्र हा तपास ज्या पद्धतीने झाला पाहिजे त्याप्रकारे होत नाही. अनिल देशमुख यांच्यासह आत्तापर्यंत चिरंजीव ऋषिकेश देशमुख, पत्नी आरती देशमुख यांना ईडीने आत्तापर्यंत समन्स बजावला आहे. मात्र यापैकी कोणीही अद्याप ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नाही. यावर वकील घुमरे सांगतात की, अनिल देशमुख चौकशीला सामोरे जात नाहीत असे म्हणणे योग्य ठरणार नाही, ईडीकडे आम्ही वारंवार पत्र देत विनंती केली की, तुम्हाला जे काही पुरावे हवेतं ते आम्ही द्यायला तयार आहोत. परंतु बाहेरील कोरोना परिस्थिती पाहता सर्व काही ऑनलाईन सुरु आहे. मग ईडीला प्रत्यक्ष चौकशी घेऊन काय साध्य करायचे आहे. ईडीला पाहिजे असलेले पुरावे आम्ही देत आहोत.

घुमरे पुढे म्हणाले की, अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी दोघांचेही वय अधिक आहे. त्यामुळे कोरोना परिस्थिती पाहता चौकशी ऑनलाईन माध्यमातून झाली पाहिजे. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ईडीला समोर बसूनच मिळणार आहेत? देशमुख ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत परंतु ही चौकशी ऑनलाईन माध्यमातून व्हावी अशी मागणी ईडीकडे करते आहोत. असेही ते म्हणाले.


 

First Published on: July 14, 2021 6:15 PM
Exit mobile version