कोर्टासारखं हवामान खातं देतंय तारिख पे तारिख – विजय वडेट्टीवार

कोर्टासारखं हवामान खातं देतंय तारिख पे तारिख – विजय वडेट्टीवार

मुंबईतील लोकल सुरु करण्यासाठी अधिक काळजी घ्या, लोकलबाबत वडेट्टीवार यांचे मोठं वक्तव्य

हवामान खात्याने २२ जून ते २६ जून दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र, आज २६ जून होऊन गेला तरी राज्यात पाऊस काही पडला नाही. हवामान खातं नेहमीच नवीन नवीन तारखा देत असतं, त्यांच्या भरोशावर राज्यातला शेतकरी पेरणी करतो, मात्र हाती काहीच लागत नाही. त्यामुळं तारिख पे तारिख द्यायला, हे हवामान खातं आहे की कोर्ट? असा संतप्त सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या चर्चेत उपस्थित केला आहे.

महसूल, वन आणि नगरविकास खात्यावर चौफेर टीका

राज्यात पावसाची स्थिती गंभीर असून पुढच्या ९१० दिवसांत पाऊस नाही पडला तर खरिपाचे पिक हातातून जाण्याची शक्यता असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. आजच्या आपल्या भाषणात त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे बेरिंग घेत महसूल, वन आणि नगरविकास खात्यावर चौफेर टीका केली.

चंद्रपूरचे वाघ आता बाहेर न्या

वन विभागावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, ‘चंद्रपूरमध्ये अगोदरच दोन व्याघ्र प्रकल्प असताना आता तिसरा प्रकल्प आणला जात आहे. चंद्रपूरात वाघाच्या यावर्षात १६ लोकांचा बळी गेलेला आहे. आजमितीला चंद्रपूरात ४७ वाघ असून आणखी वाघांचा जन्म अपेक्षित आहे. एका वाघाला लागणारे वन क्षेत्र कमी झाल्यामुळे आता वाघ मानवी वस्तीत शिरकाव करु लागला आहे. त्यामुळे चंद्रपूरात आणखी व्याघ्रप्रकल्प नको तर इथलेच वाघ दुसरीकडे नेण्याची गरज आहे‘, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.


हेही वाचा – एसआरए योजनेत ७ हजार कोटींचा घोटाळा – विजय वडेट्टीवार


 

First Published on: June 27, 2019 10:23 AM
Exit mobile version