ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालन्यात एल्गार

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालन्यात एल्गार

जालना येथे ओबीसी समाजाच्या वतीने आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मागण्यासाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून ११ वाजता सुरुवात झाली असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित होण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, ओबीसी मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन सरकारच्या वतीने मंत्री विजय वडेट्टीवार स्वीकारणार आहेत.

काय आहेत मागण्या?

विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजाने आज मोर्चा काढला आहे. यामध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करावी, ही मुख्य मागणी आहे. यासोबतच नॉन क्रिमीलेयरची अट रद्द करावी यासह इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत.

अनेक लोक पारंपारिक वेशभूषेत दिसणार

या मोर्चामध्ये अनेक लोक विविध पारंपारिक वेशभूषेत दिसणार आहेत. वंजारी, माळी, बारा बलुतेदार अशा समाजांचा या मोर्चात सहभाग असणार आहे. दरम्यान, या मोर्चात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, हंसराज अहिर, महादेव जानकर, समीर भुजबळ, विकास माहात्मे यांसह सर्वच पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत.


हेही वाचा – एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची परवानगी; ३० जानेवारीला परिषद होणार


 

First Published on: January 24, 2021 11:21 AM
Exit mobile version