औरंगाबाद : एकाच कुटुंबातील तीन महिला कोरोनाबाधित

औरंगाबाद : एकाच कुटुंबातील तीन महिला कोरोनाबाधित

कोरोना विषाणू

कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट होताना दिसत आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये आणखी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकाच कुटुंबातील तीन महिलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची संख्या ४५ वर गेली असून मृतांची संख्या ५ वर गेली आहे. तर सध्या या महिलांवर मिनी घाटी रुग्णालयात उपचार सुरु असून एकूण २० रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे.

एकाच कुटुंबात आढळलेले रुग्ण

औरंगाबादमध्ये एकाच कुटुंबात आढळलेले रुग्ण हे १८ ते ३१ या वयोगटातील असून ते हिलाल कॉलनीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या महिलांच्या घरातील सर्व सदस्यांना आणि शेजाऱ्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच या तिन्ही महिला ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत. याची यादी तयार केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या मिनी घाटीत एकूण १८ तर घाटीन दोन अशा एकूण २० जणांवर सध्या उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे.


हेही वाचा – खासगी दवाखाने सामान्य रुग्णांसाठी तातडीने उघडा


 

First Published on: April 25, 2020 10:43 AM
Exit mobile version