घटसर्प रोगामुळे बीडमध्ये ८० पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू

घटसर्प रोगामुळे बीडमध्ये ८० पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू

बीडमध्ये जनावरांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील आंतरवन पिंपरी गेल्या काही दिवसापासून अज्ञात आजारामुळे गुरं दगावत आहेत. आतापर्यंत ८० पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. या जनावरांना घटसर्प या रोगाची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटसर्प रोगावर आवश्यक असणारी लस नसल्याने हा घात झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन कार्यलयात जाऊन चांगलाच राडा केला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. पशुसंवर्धन अधिकारी संतोष पालवे यांना धक्का बुक्की केली.

पशुसंवर्धन अधिकाऱ्याला धक्काबुक्की

बीड जिल्ह्यातील अंथरवन पिंपरी गावामध्ये ८० पेक्षा अधिक जनावरं दगावल्याची घटना घडली आहे. गेल्या आठ दिवसापासून या गावातील जनावरं अज्ञात आजाराने दगावत होती. मात्र नेमकं जनावरांना काय झाले समोर येत नव्हते. दगावलेल्या जनावरांमध्ये गाय, म्हैस यासह शेळी आणि कोकरांचा समावेश आहे. मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना घटसर्प आजार झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अंथरवन पिंपरी येथील सर्वच जनावरांवर उपचार सुरु आहेत. गुरुवारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यास धक्काबुक्की केली होती. त्यांच्याविरोधात गुरुवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास गुन्हे दाखल करण्यात आले.

आर्थिक मदतीची मागणी 

अंथरवन पिंपरी येथे डॉक्टरांचे पथक तैनात असून जनावरांना लसीकरण आणि इतर उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. आगोदरच भीषण दुष्काळ असताना चाऱ्या अभावी त्रस्त असणारे जनावरे आत्ता संसर्गजन्य रोगाने दगावत आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान होतं असतांना प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. म्हणून शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये तोडफोड केली. यात जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कार्यालयाची देखील तोडफोड करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांची जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

First Published on: January 12, 2019 11:04 AM
Exit mobile version