मास्क न वापरण्याबाबत खासदार राऊत यांनी दिले हे कारण

मास्क न वापरण्याबाबत खासदार राऊत यांनी दिले हे कारण

नाशिक येथे आयोजित एका विवाह सोहळयास उपस्थित असलेल्या खासदार संजय राऊत यांना आपण मास्क का वापरत नाही असा सवाल केला असता त्यांनी मास्क न वापरण्याबाबत अजबच कारण दिले. कोरोनापासून काळजी घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला मास्क लावा सांगतात, पण ते स्वतः मास्क लावत नाहीत. मुख्यमंत्री मास्क लावतात, पण देशाचे नेते मोदी आहेत. आपण पंतप्रधानांचे ऐकतो, मी सुद्धा त्यांचं अनुकरण करतो असे सांगत त्यांनी मास्क वापरावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला.

खासदार राऊत नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले. सध्या राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे मात्र दिवसा निर्बंध लावण्याची वेळ येऊ नये असं वाटते. तसे झाल्यास पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. मास्क वापरावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लक्ष वेधले. देशाची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐकते. मी स्वत: देखील त्यांचं अनुकरण करतो. ते मास्क लावत नाहीत म्हणून आम्हीही मास्क लावत नाहीत. लोकही मास्क लावत नाहीत, असे सांगत खासदार राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

First Published on: December 30, 2021 11:56 AM
Exit mobile version