दसरा मेळाव्यासाठी परवानगी न देण्यामागे राजकीय दबाव, खासदार विनायक राऊतांचं सूचक वक्तव्य

दसरा मेळाव्यासाठी परवानगी न देण्यामागे राजकीय दबाव, खासदार विनायक राऊतांचं सूचक वक्तव्य

शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा रंगत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने अद्यापही परवानगी न दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी परवानगी न देण्यामागे राजकीय दबाव असल्याचं सूचक वक्तव्य शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे.

विनायक राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र, हात आखडता घेतला आहे. पारंपारिक दसरा मेळावासंबंधी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागणारे पत्र देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी आधी सकारात्मक भूमिका दाखवली. सध्या राजकारणाची हद्द पार होताना दिसत असल्याचे विनायक राऊत म्हणाले.

शिंदे गटाच्या आमदारांनी खोके कमावले आहेत. त्यांना ते खर्च करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांच्याकडून उधळपट्टी होणार हे जनतेला माहीत आहे. मात्र, या हरामाच्या पैशाला गणेशभक्त हात लावतील असे वाटत नसल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी केली. यामुळे शिवसेनेत उभी फूड पडली. शिवसेनेच्या आमदारांसह अनेक खासदार आणि नगरसेवकही शिंदे गटात सहभागी झाले. ज्यानंतर आता शिंदे गटाकडून खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच सुप्रीम कोर्टात यावरून न्यायालयीन लढाई सुरु आहे.


हेही वाचा : चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश


 

First Published on: August 27, 2022 7:30 PM
Exit mobile version