एमपीएससीतर्फे पीएसआयच्या ३८७ पदांसाठीचा निकाल जाहीर, सोलापूरची बाजी

एमपीएससीतर्फे पीएसआयच्या ३८७ पदांसाठीचा निकाल जाहीर, सोलापूरची बाजी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक पदांसाठीच्या ३८७ जागांसाठीचा निकाल आज घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दुय्यमसेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य परीक्षा)-२०१८ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील वैभव नवलेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर महिलांमधून सातारा जिल्ह्यातील दीपाली कोळेकर प्रथम आली आहे. नगर जिल्ह्यातील ज्ञानदेव काळे मागसावर्गावरीतून प्रथम आला आहे. या परीक्षेसाठीचे कट ऑफ मार्क आयोगाच्या https://www.mpsc.gov.in/1035/Home  संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

https://www.mpsc.gov.in/Site/Upload/Pdf/PSI_M_%20Exam-2018%20Annauncement_17032020.pdf

#MPSC तर्फे #PSI च्या ३८७ पदांसाठी घेण्यात आलेल्या #महाराष्ट्रदुय्यमसेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य परीक्षा)-२०१८ चा अंतिम निकाल जाहीर.
✅सोलापूर जिल्ह्यातील वैभव नवले प्रथम
✅नगर जिल्ह्यातील ज्ञानदेव काळे मागासवर्गवारीतून प्रथम
✅महिलांमधून सातारा जिल्ह्यातील दीपाली कोळेकर प्रथम. pic.twitter.com/D51MVBjtnl

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 17, 2020

या पदासाठीची मुख्य परीक्षा २६ ऑगस्ट २०१८ रोजी तसेच सप्टेंबर २०१८ रोजी मुंबई, औरंगाबाद, पुणे आणि नागपूर जिल्ह्यात घेण्यात आली. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी १६५९ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले. तसेच नोव्हेंबर २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या.

First Published on: March 17, 2020 3:58 PM
Exit mobile version