MPSC Result : एमपीएससीच्या दुय्यम गट ब च्या सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर

MPSC Result : एमपीएससीच्या दुय्यम गट ब च्या सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ४ सप्टेंबरला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० घेण्यात आली होती. या परीक्षेमधून राज्य कर निरीक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल १ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या संवर्गाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ४ सप्टेंबरला अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० घेण्यात आली होती. या परीक्षेमधून सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून सहाय्यक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल ३० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकालही उमेदवारांना mpsc.gov.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सुचना

१) या पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी दिलेल्या कालावधील अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.

२ )अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.

३) राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या उमेदवारांचा मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक १ हा २२ जानेवारी २०२२ पेपर क्र.२ दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येईल.

४) तर सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या उमेदरांचा मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक १ हा २२ जानेवारी २०२२ पेपर क्र.२ हा ५ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येईल.

५) प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या/ समांतर आरक्षणाच्या मुद्यासंदर्भात विविध न्यायालयात तसेच न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

६) मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळवण्यात येईल.

७) मुख्य परीक्षेच्या पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती परीक्षा शुल्क मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल दावे हे मुख्य परीक्षेकरीता स्वीकारण्यात येतील.


 

First Published on: December 1, 2021 7:28 PM
Exit mobile version