MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित, शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित, शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

पुणे – एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात यावा याकरता पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. थंडी वाऱ्याची तमा न बाळगता विद्यार्थ्यांनी सलग १८ तास आंदोलन केले. अखरे, हे आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घेतले असून पाच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पुण्यात आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तसंच हे आंदोलन स्थगित केलं असलं तरीही स्वल्पविराम आहे पूर्णविराम नाही, असंही विद्यार्थ्यांनीही म्हटलं आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. परीक्षेचा हा नवा पॅर्टन (2023) याच वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. मात्र विद्यार्थ्यांना परीक्षेचा नवा पॅर्टन मान्य नसून त्याविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी काल ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

१) MPSC परीक्षांचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा.

२) नवा पॅटर्न लागू करण्यासाठी प्रशासनाने घाई करु नये.

३) अभ्यास करण्यासाठी किमान 5 ते 6 महिन्यांचा अवधी मिळावा.

४) नवा अभ्यासक्रम UPSC च्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने त्याबाबत पुस्तक उपलब्ध करुन द्यावी.

First Published on: January 14, 2023 10:37 AM
Exit mobile version