एसटी महामंडळाचा देशी जुगाड; ५ सॅनिटायझर एसटी बसेसची केली निर्मिती

एसटी महामंडळाचा देशी जुगाड; ५ सॅनिटायझर एसटी बसेसची केली निर्मिती

अवघ्या तीन दिवसात पाच देशी सॅनिटायझर बसची निर्मिंती

कर्नाटक एसटी महामंडळाने देशाची अत्याधुनिक पहिली मोबाईल सॅनिटायझर बसची निर्मिती केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये अवघ्या तीन दिवसात पाच देशी सॅनिटायझर बसची निर्मिती केली आहे. या बसेसची पाहणी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. या पाचही सॅनिटायझर एसटी बसेस निर्मिती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली आहे.

तीन दिवसात पाच सॅनिटायझर बसेसची निर्मिती

कोरोना विषाणू जगभरात धुमाकूळ घालत असून देशातील परिस्थिती सध्या गंभीर बनत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अनेक एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. कर्नाटकच्या एसटी महामंडळाने देशाची पहिली मोबाईल सॅनिटायझर बसची निर्मिती केली असून त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुद्धा अवघ्या तीन दिवसात पाच सॅनिटायझर बसेसची निर्मिती केली आहे.

कुर्ला नेहरूनगर कार्यशाळेत १ , पुण्यातील दापोडी कार्यशाळेत २, औरंगाबाद कार्यशाळेत १ आणि ठाण्याच्या कार्यशाळेत १ अशा एकूण पाच बसेस तयार करण्यात येत आहेत तर एसटी महामंडळाच्या कुर्ला नेहरूनगर आगाराच्या कार्यशाळेतील बस तयार झाली आहेत. संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळ काही अंशी सुरू आहेत. या कोरोनाच्या जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कर्नाटक एसटी महामंडळाच्या धर्तीवर एसटी महामंडळाने अत्यंत कमी कालावधीत या बसेस तयार केल्या आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सूत्राने दिली आहेत.


CoronaVirus: देशातली पहिली मोबाईल सॅनिटायझर एसटी तयार
First Published on: April 15, 2020 7:50 PM
Exit mobile version