एसटी धावणार शाळकरी विद्यार्थ्यांच्या टाईम टेबलनुसार

एसटी धावणार शाळकरी विद्यार्थ्यांच्या टाईम टेबलनुसार

एसटी स्टॅन्ड

शालेय विद्यार्थ्यांची एसटी महामंडळाच्या बसेसवर असणारी भिस्त पाहता आगामी दिवसात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकानुसार एसटीच्या बसेसच्या फेऱ्या होणार आहेत. खेडोपाडी तसेच तालुक्याच्या कनेक्टिव्हिटीसाठी शाळकरी मुलांना एसटीचाच आधार आहे. म्हणूनच आता एसटीचे वेळापत्रक तयार करताना स्थानिक शाळकरी मुलांचे शाळेचे वेळापत्रक पाहून मार्गांची रचना करण्यात येईल. तसेच वेळापत्रकही शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार आखण्यात येईल अशी घोषणा वित्त आणि नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी आज केली. त्यामुळे राज्यातील ग्रामीण महाराष्ट्राताली मुलांसाठी एक अतिशय दिलासा देणारी अशी गोष्ट आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आली आहे.

लालपरीला नवा साज

एसटी महामंडळाची खेडोपाडी चालणारी सेवा आता अधिक अत्याधुनिक अशी होणार आहे. राज्यातील एसटी महामंडळाच्या ताफ्यातून जुन्या बसेस स्क्रॅप करून नवीन १६०० बस खरेदीचा निर्णय आजच्या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आली आहे. जुन्या बसच्या जागी अत्याधुनिक बस खरेदी करण्यात येतील. तसेच टप्प्याटप्प्याने जुन्या एसटी बसेस स्क्रॅप करण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आले. कमी अंतराच्या प्रवासाच्या पर्यायासाठी राज्यात मिडी बसही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तसेच खेडोपाडी चालणाऱ्या सर्व जुन्या बस एवजी नवीन बस चालवण्यात येतील असेही अजितदादा यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. एसटीच्या संपुर्ण मेकओव्हरसाठी ४०० कोटींची घोषणा आज जाहीर करण्यात आली. त्यामध्ये एसटीच्या बस स्थानकांचा कायापालट करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहेत.

First Published on: March 6, 2020 3:00 PM
Exit mobile version