मुंबई अलिबाग रो रो बोटीचा पहिला लुक

मुंबई अलिबाग रो रो बोटीचा पहिला लुक

Mumbai alibaug roro service

मुंबईला अलिबागशी अवघ्या काही मिनिटात कनेक्ट करणारी बहुप्रतिक्षित अशी रो रो सेवा अखेर
मुंबई अलिबाग रो रो सेवेचे दर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डामार्फत जाहीर करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या श्रेणीनुसार या सेवेसाठीचे दर आकारण्यात येणार आहेत.

मुंबई अलिबाग सेवेतल लक्झरीयश कंमार्टमेंंट

अलिबाग (मांडवा) ते भाऊचा धक्का या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी दोन्ही बाजुला जेट्टीचे काम पुर्ण झाले आहे. तसेच या सेवेसाठी ग्रीसवरून ही बोट आणण्यात आली आहे. एकुण ९५ मीटर लांब आणि १५ मैल प्रति तास या वेगाने चालणारी ही बोट आहे.

रो रो सेवा

याआधी केंद्रीय जलवाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक प्रयत्न करत या सेवेसाठीचा पाठपुरावा केला होता. मुंबई मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्टनेही हे काम जलदगतीने होईल यासाठीचा पुढाकार घेतला होता. अखेर या सेवेला आता सुरूवात होणार आहे.

रोरोसेवा

मेरिटाईम बोर्डाने जाहीर केलेल्या दरानुसार अलिबाग ते भाऊचा धक्का दरम्यानच्या सेवेसाठी सर्वसामान्य प्रवाशांसाठी २२० रूपये मोजावे लागतील. तर वातानुकुलित सेवेसाठी ३३० रूपये मोजावे लागतील. लक्झरीयश सेवेसाठी ५५० रूपये आकारण्यात येणार आहेत. तर वाहनांसाठी वेगळे दर ठेवण्यात आले आहेत. लहान आकाराच्या वाहनांसाठी ११०० रूपये, मध्यम आकाराच्या वाहनांसाठी १५०० रूपये आणि मोठ्या आकाराच्या वाहनांसाठी १९०० रूपये आकारण्यात येणार आहेत.

First Published on: February 21, 2020 1:05 PM
Exit mobile version