मध्य रेल्वेच्या मुख्य अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना सीबीआयकडून अटक

मध्य रेल्वेच्या मुख्य अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना सीबीआयकडून अटक

मध्य रेल्वेच्या मुख्य अभियंत्याला लाच घेताना सीबीआयने अटक केली आहे. अशोक कुमार गुप्ता असे मध्य रेल्वेच्या मुख्य अभियंत्याचे नाव आहे. अशोक कुमार गुप्ता यांनी आपल्या ड्रायव्हरमार्फत 1 लाखाची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला. शिवाय, याप्रकरणी अधित तपासणी करत या अभियंत्याला अटकही केली आहे. (mumbai central railway chief engineer arrested by cbi due to taking bribe of one lakh rupees)

मिळालेल्या माहितीनुसार, अभियंता अशोक कुमार गुप्ता याच्याकडे मेकॅनिकल डिपार्टमेंटने दिलेल्या सर्व कंत्राटाची बिल्स क्लिअर करण्याचे अधिकार होते. त्यामुळे अशाच एता कंत्राट दिलेल्या एका कंपनीचे बिल्स क्लिअर करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच गुप्ताने घेतली होती. सीबीआयने लाच घेतलेले 1 लाख रुपये हस्तगत केले आहेत. गुप्तासह मुंबई, कोलकाता, गाझियाबाद, नोएडा, देहरादून आणि दिल्ली अशा शहरातील वेगवेगळ्या 10 ठिकाणी छापेमारी केली.

याप्रकरणी सीबीआयने अशोक कुमार गुप्ता यांच्यासह त्यांचा ड्रायव्हरलाही अटक केली आहे. त्याचा ड्रायव्हरही मध्य रेल्वेत कामाला असल्याचे समजते. तसेच कोलकाता येथील एका प्रायव्हेट कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

या छापेमारीत तब्बल 23 लाखांची रोकड, चाळीस लाखांचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने, 8 कोटींची इन्व्हेस्टमेंट डिटेल्स, 5 कोटीची नोएडा, हरिद्वार, देहरादून आणि दिल्ली येथील घर आणि जमिनीची कागदपत्रे जप्त केली आहेत. इतकेच नाही तर गुप्ताचे 3 विदेशी बँकेमध्ये अकाउंट्स आहेत. सिंगापूर आणि अमेरिकेतील याच बँक अकाउंट्समध्ये 2 लाख यु एस डॉलर्स इतकी रक्कम देखील आहे. तसेच गुप्ताच्या कुटुंबाचे देखील विदेशात बँक अकाऊंट आहेत. यासोबत एक लॉकर देखील सीबीआयला सापडले आहे.


हेही वाचा – महाराष्ट्र विद्यापीठ सुधारणा विधेयक अखेर मागे; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे महत्त्वाचे निर्णय

First Published on: September 27, 2022 10:17 PM
Exit mobile version