Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण मृत्यू संख्येत घट, २४ तासात ४६६ रुग्णांची कोरोनावर मात

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण मृत्यू संख्येत घट, २४ तासात ४६६ रुग्णांची कोरोनावर मात

Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर

मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात ३४३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सोमवारी मुंबईत २९९ कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर मंगळवारी कोरना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ही १० च्या घरात होती मात्र गेल्या २४ तासात मुंबई पालिका क्षेत्रात ५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत घट झाली असल्याची चांगली बाब आहे. मुंबईत सध्या ५ हजार २६७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत आतापर्यंत ७ लाख ३४ हजार ७६१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये ७ लाख ११ हजार ३१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १५ हजार ७८९ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत २४ तासात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या कोरोनाबाधितांच्या आढळण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. मागील २४ तासात ४६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला असल्यामुळे कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात यावी अशी मागणी मुंबईकर आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

मुंबईतील कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या असून गेल्या २४ तासात मुंबईमध्ये २८ हजार ०५८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत फक्त मुंबईत ८० लाख १८ हजार ३७७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. तर २० जुलै ते २६ जुलै २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०५ टक्क्यांवर गेला आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर १३७७ दिवसांवर गेला आहे.

मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २ रुग्णाना काही दीर्घकालीन आजार होते. ४ रुग्ण पुरष व १ रुग्ण महिला होते. ३ रुग्णांचे वय ६० वर्षा वर होते. उर्वरित २ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुंबईत सध्या ६५ इमारती या सीलबंद करण्यात आल्या आहेत. तर सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या ५ वर गेली आहे.

First Published on: July 27, 2021 8:33 PM
Exit mobile version