Mumbai Corona Update: नव्या कोरोनाबाधितांचे प्रमाण घटले, मुंबईत गेल्या २४ तासात १ हजार ६६ कोरोनारुग्णांची नोंद

Mumbai Corona Update: नव्या कोरोनाबाधितांचे प्रमाण घटले, मुंबईत गेल्या २४ तासात १ हजार ६६ कोरोनारुग्णांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली, गेल्या २४ तासात ६०८ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत गेल्या २ महिन्यांनंतर कोरोनाच्या हाहाकारामध्ये थोडासा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजाराच्या संख्येत स्थिरावली असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील २४ तासात मुंबईत २२ कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी १८ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. मुंबईत एकाच दिवशी १ हजार ३२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याच कायम अधिक राहिली आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांचे प्रमाण घटत असल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर कोरोना रोखण्यात मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकारला यश येताना दिसत आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४१४ दिवसांवर पोहोचला आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत एकुण २७ हजार ३२२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत १४ हजार ८५५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून यामध्ये गेल्या २४ तासात २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत आतापर्यंत एकुण ७ लाख ५ हजार ५७५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये ६ लाख ६१ हजार २२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत एकुण ६२ लाख ५३ हजार ८७८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये गेल्या २४ तासात २४ हजार ५४८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १८ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. १३ रुग्ण पुरुष व ९ रुग्ण महिला होते. १५ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित ७ रुग्ण ४० ते ६० वयोगटमधील होते. सध्या मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचे निदान घटले असले तरी ३८ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. १६० सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

First Published on: May 30, 2021 8:10 PM
Exit mobile version