गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व खड्डे बुजवू, रवींद्र चव्हाणांचं आश्वासन

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व खड्डे बुजवू, रवींद्र चव्हाणांचं आश्वासन

मुंबईसह राज्यभरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी निर्माण होते. तसेच नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. याशिवाय खड्ड्यांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यावर आज सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी “मुंबई-गोवा महामार्गावरील ठाणे ते बेलापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक अपघात घडत असून, यामध्ये प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर निवेदन काढावे”, अशी मागणी सूनील प्रभू यांनी केली. यावर गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे बुजवू, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. तसेच, डिसेंबर २०२३ च्या अखेरीसपर्यंत पूर्ण होईल असा आश्वासन दिले. (Mumbai Goa highway will be completed by the end of December 2023 assured Ravindra Chavan)

विधानसभेच्या अधिवेशनाच्या सुरूवातीला झालेल्या विशेष बैठकीमध्ये कोकणाच्या आमदारांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा आणि तो मार्ग बनवण्यासाठी लागणाराला कालावधी या मुद्द्यांवर चर्चा केली. “मुंबई-गोवा महामार्गावरील ठाणे ते बेलापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक अपघात घडत असून, यामध्ये प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहेत”, असे आमदार सुनील प्रभू यांनी म्हटले.

मुंबई गोवा महामार्गाचे काम १२ वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गाच्या १० टप्प्यांपैकी ९ टप्प्यांचे काम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच, पनवेल ते इंदापूर या एका टप्प्याचे काम राष्ट्रीय महामार्गातर्फे करण्यात येणार आहे. १२ वर्षांपासून रखडलेला देशातील हा एकमेव महामार्ग आहे.

येत्या काळात गणेशोत्सव असून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या खड्डयांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या महामर्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली.

First Published on: August 18, 2022 11:13 AM
Exit mobile version