जगबुडी नदीने अडवला मुंबई-गोवा महामार्ग

जगबुडी नदीने अडवला मुंबई-गोवा महामार्ग

जगबुडी नदी

कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसाने मुंबई-गोवा मार्गात अडथडा निर्माण केली आहे. कारण खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई-गोवा महामार्गवरील जगबुडी नदीचा पूल बंद करण्यात आला आहे. पूलाजवळ पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम

जगबुडी नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये झाला आहे. दरम्यान सह्याद्रीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पर्जनवृष्टी झाली. यामुळे पाण्याची पातली वाढली आहे. पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात वाईट अवस्था आहे. जगबुडी नदीने तर धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनाने मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई-गोवा वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

First Published on: July 12, 2019 11:46 AM
Exit mobile version