मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर; पण प्रवास अद्याप स्वस्तच

मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर; पण प्रवास अद्याप स्वस्तच

मुंबईसह देशभरातील महागाई दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे जगातील ४५ शहरांपैकी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वात स्वस्त आहे. याबाबत जागतिक तिकीट जैत, डिस्काउंट फर्म पिकोडीच्या बीज अहवालात नमूद करण्यात आले आहे. पिकोडी या संस्थेने आपल्या अहवालात एकेरी तिकिट, मासिक पास यावर अभ्यास केला. (Mumbai is an international city But travel is still in lower price VVP96)

पिकोडी या संस्थेच्या अहवालात लंडन, झुरिच, ओस्लो या शहरात सर्वात महाग एकेरी तिकिट आहे. मासिक पास घेण्याकरिता लंडन, डब्लिन आणि न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक पैसे मोजावे लागतात. त्या तुलनेत मुंबईत मासिक पासाची किंमत खूपच कमी असल्याचे म्हटले आहे.

जगभरातील ४५ शहरांमधील या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधील तिकिट दर स्थानिक नागरिकांचे वेतन आणि त्याचा वाहतुकीवर करा होणारा खर्च याचा विचार करून हा निकर्ष काढण्यात आला आहे. ४५ शहरांपैकी तीन शहरांमध्ये नांगरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे मोफत आहे. त्यात लक्झेंबर्ग, एस्टोनियाची राजधानी टॅलिन आणि माल्टाची राजधानी व्हॅलेटा या शहरांचा समावेश आहे.

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व प्रवासी

मुंबईत मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे अशी उपनगरीय लोकल धावते. मोनो, मेट्रो, बेस्ट, रिक्शा टॅक्सी, ओला-उबर या मोबाईल अॅप आधारित सेवाही सुरू आहेत. मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावरून दररोज सुमारे ७० लाख प्रवासी प्रवास करतात. तसेच, बेस्टने ३२ लाख आणि मेट्रोमधून सुमारे ८ ते १० लाख प्रवासी प्रवास करतात. या उपनगरीय रेल्वे मार्गावर साध्या लोकलसोबतच एसी लोकलही धावत आहे.

तिकीट दर


हेही वाचा – पश्चिम रेल्वेवर बुधवारपासून येणार ‘यात्री ॲप’; लोकलचे लाइव्ह लोकेशन समजणार

First Published on: April 4, 2023 10:16 AM
Exit mobile version