मुंबई महापालिका निवडणुकीत ‘महिला राज’, ११८ प्रभाग महिलांसाठी आरक्षित

मुंबई महापालिका निवडणुकीत ‘महिला राज’, ११८ प्रभाग महिलांसाठी आरक्षित

मुंबई महापालिकेच्या सन २०२२ करीत सार्वत्रिक निवडणूक घेण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्णत्वाच्या मार्गावर पोहोचली आहे. ३१ मे व २९ जुलै रोजी दोन टप्प्यात प्रभाग आरक्षण पार पडले आहे. त्यामुळे या निवडणुकीतील खुले व आरक्षित प्रभाग कोणते ते चित्र स्पष्ट झाले आहे. एकूण २३६ प्रभागांपैकी महिलांसाठी आरक्षित ५० टक्के प्रभाग म्हणजे ११८ प्रभाग जाहीर झाले आहेत. यामध्ये, अनुसूचित जातीसाठीचे – ८, अनुसूचित जमातीचे -१, ओबीसीचे ३२ आणि सर्वसाधरण महिला प्रभाग -७७ अशा एकूण ११८ प्रभागांचा समावेश आहे. त्याशिवाय महिला उमेदवार या खुल्या प्रभागातही निवडणूक लढवीत असतात. एफ/ उत्तर, एफ/ दक्षिण वार्डात तर ९० टक्के प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत. तर काही प्रभागांत महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या निवडणुकीत महिला उमेदवार या १२० पेक्षाही जास्त प्रभागात निवडून येण्याची शक्यता पाहता पालिकेत ‘महिला राज’ दिसणार आहे.

मुंबई महापालिकेत जेव्हापासून महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू झाले तेव्हापासून पालिकेत महिला नगरसेवकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कारण की, पुरुष उमेदवारांना महिलांच्या आरक्षित प्रभागात निवडणूक लढविता येत नाही. मात्र महिला उमेदवारांना महिला प्रभाग व इतर कोणत्याही प्रभागात निवडणूक लढविण्यास मुभा आहे. अपवाद ज्या ठिकाणी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, ओबीसी महिला असे आरक्षण लागू आहे त्या ठिकाणी त्याच प्रवर्गाच्या महिलेला निवडणूक लढवीता येते. त्यामुळे महिलांसाठी या निवडणुकीत मैदान खुले आहे. मात्र महिलांना राजकीय पक्ष एका मर्यादेतच संधी देतात. कारण की, पुरुष उमेदवारांवर जास्त अन्याय होऊ नये. त्यामुळे राजकीय पक्षांना तो समतोल साधावा लागतो. मात्र त्यावर कडी करीत नाराज महिला अपक्ष म्हणून मैदानात उतरतात आणि काही महिला उमेदवार विजयी होतात.

महिला राज असे असणार

या निवडणुकीत महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्यावर काही वार्डात ५० टक्के ते ९० टक्के प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित झाल्याचे चित्र दिसून येते. यामध्ये,

First Published on: July 30, 2022 11:06 PM
Exit mobile version