मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवर नऊ दिवसांचा ब्लॉक

मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवर नऊ दिवसांचा ब्लॉक

Landslide

मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्यांना आता काही दिवसांचा ब्रेक लागणार आहे. पुढील आठवड्यात तब्बल ९ दिवसांचा रोड ब्लॉक या हायवेवर असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एक्सप्रे हायवेवरील खंडाळा बोगदा (पुणे आणि मुंबई लेन) येथील किमी ४६.७१० ते ४६. ५७९ दरम्यान निखळत आलेले दरडीचे दगड काढण्याचे काम करण्यात येणार आहेत. दरम्यान, त्यामुळे १२ मार्च ते २० मार्च दरम्यान ठराविक वेळेत दरडीचे दगड काढणाचे काम करण्यात येणार आहे.

दरदिवशी १५-१५ मिनिटांसाठी बंद 

दरडीचे दगड काढण्याचे काम करताना पुणे आणि मुंबई लेनवरील वाहतुकीवरील वेळेत प्रत्येकी १५ मिमिटाकरीता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तसेच १५ मार्च दुपारी ३.१५ पासून १८ मार्च सकाळी १२ वाजेपर्यंत वाहतूक चालू ठेवण्यात येणार आहे. वाहतूकीतील या बदलाबाबात सर्व वाहन चालकांनी तसेच प्रवाशांनी नोंद घेणाचे तसेच त्यानुसार आपले नियोजन करण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे महामार्ग सुरक्षा पथक पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी केले आहे.

प्रत्येक दिवशी या वेळेत ब्लॉक असणार 

First Published on: March 8, 2019 4:45 PM
Exit mobile version