नव्या रुपातील प्रगती एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत

नव्या रुपातील प्रगती एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत

प्रगती एक्सप्रेस

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसच्या सुविधांच्या दर्जात बदल करण्यात आला असून या एक्सप्रेसचा संपूर्ण कायापालट केला आहे. नव्या रुपातील ही एक्स्प्रेस रविवार, ४ नोव्हेंबरपासून मध्य रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. उत्कृष्ट रेक प्रकल्पांतर्गत हा बदल घडविण्यात आला आहे. सध्या वापरात असलेल्या विविध रेल्वे गाड्यांच्या डब्यांची रचना बदलून त्यामध्ये अनेक नवीन सुविधा सुरू करण्यासाठी आणि अंतर्गत सजावट बदलण्यासाठी रेल्वे बोर्डाने परवानगी दिली होती. त्यामध्ये प्रगती एक्स्प्रेसचा समावेश करून सुविधांचा दर्जा वाढविण्यात आला आहे.

रेल्वेतील डब्यांमध्ये आकर्षक साज 

अधिक स्वच्छता राखता यावी यासाठी शौचालयांमध्ये सिरामिक टाईल्स बसविण्यात आले आहेत. तसेच हवा खेळती रहावी यासाठी खास पद्धतीने खिडक्या बसवण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी डब्यात भरपूर उजेड रहावा यासाठी एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. गाडीच्या डब्यांमध्ये हवेशीर वातावरण रहावे, यासाठी नवीन पंखे देखील बसविण्यात आले आहेत. एसी कोचमधील प्रवाशांना माहिती मिळण्यासाठी डिस्प्लेची सुविधा उपलब्ध आहे. रेल्वेचा प्रत्येक डबा आकर्षक आणि रंगसंगतीद्वारे सजविण्यात आला आहे.

तब्बल ६० लाख रुपये खर्च 

मध्य रेल्वेने ५ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा (१० रेक) मध्ये समावेश करण्यात आला असून त्यांचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. प्रत्येक रेल्वेमध्ये नवीन सुविधा बसविण्यासाठी ६० लाख रुपये खर्च केले जाणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले आहे.

First Published on: November 4, 2018 5:19 PM
Exit mobile version