दारूच्या वादातून मित्राचा खून

दारूच्या वादातून मित्राचा खून

दारू पिण्याच्या वादातून मित्रानेच एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याचे उघडकी आले आहे. पोलिसांनी सापळा रचून एकाला अटक केली आहे. रवी ऊर्फ पिंट्या तुकाराम लिलके (२१, रा.चिंचोळे शिवार, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. संतोष पवार (६०, रा.गोशाळा, हिरावाडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

जनार्दन स्वामी मठ गेट क्रमांक चारसमोर संतोष पवार (६०, रा.गोशाळा, हिरावाडी) यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खून केल्यानंतर घटनास्थळावर कोणताही पुरावा न ठेवता आरोपी पळून गेले होते. गुन्हा उघडकीस आणणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. पोलिसांनी समांतर तपास सुरू केला होता. दरम्यान, संशयित आरोपी पिंट्या याने संतोष पवार याचा खून केला असून तो मुंबईनाका परिसरात फिरत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकास शुक्रवारी (दि.७) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. 2 ऑगस्ट रोजी संतोष पवार आणि आरोपी रवि लिलके यांच्यामध्ये दारू पिणे वरून वाद झाले. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने रवी लेके याने संतोष पवार याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याला जखमी केले. घाव वर्मी लागल्याने संतोष पवार याचा जागीच मृत्यू झाला होता.

पोलिसांना बक्षीस
घटनास्थळी मारेकर्‍यांना कोणताही ठोस पुरावा सोडलेला नसतानाही गुन्हे शोध पथकाने लावल्या तपासाबद्दल नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चार पोलीस कर्मचार्‍यांना 25 हजार रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे.

First Published on: August 7, 2020 5:59 PM
Exit mobile version