पुण्याचे नवे महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब

पुण्याचे नवे महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुरलीधर मोहोळ पुण्याचे नवे महापौर

पुण्यात महापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने मोहोळ हे महापौर होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. तीन वेळा नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात ते इच्छूक होते. पंरतु ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पक्षाने कोथरूड मधून उमेदवारी दिली होती. मोहोळ यांना महापौर पदाची संधी देऊन समतोल साधला जात आहे.

मागच्याच आठवड्यात महाराष्ट्रातल्या २७ महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघाली. मुंबई, पुणेसह मोठ्या महानगरापालिकेंच्या महापौरपदी खुल्या गटाचे आरक्षण पडलेले आहे. पुणे मनपामध्ये खुल्या गटातून अनेक नगरसेवक महापौरपदासाठी इच्छूक होते. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महापौरपदासाठी २२ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी अर्ज भरण्यासाठी आज सकाळी ११ ते १ वाजेपर्यंतची मुदत आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपचे निर्विवाद बहुमत असल्यामुळे इथे भाजप जो देईल तो उमेदवार महापौर होईल, यात शंका नाही.

First Published on: November 18, 2019 12:17 PM
Exit mobile version