आई मला लाडाने ‘चंद्या’ म्हणते तर विरोधक प्रेमापोटी ‘चंपा’ म्हणतात

आई मला लाडाने ‘चंद्या’ म्हणते तर विरोधक प्रेमापोटी ‘चंपा’ म्हणतात

सत्ता गेल्याने भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी कुणीच पुढे येईना

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.प्रचारातून चंद्रकांत पाटलांना विरोधकांनी अनेक वेळा ‘चंपा’ म्हणून लक्ष्य केले आहे.परंतु,विरोधकांच्या या खिल्लीला चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. मला अजित पवार यांनी ‘चंपा’ म्हटले, त्यावर राज्यात चर्चा झाली. ही चर्चा थांबत नाही तोच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील चंपा म्हटले.

असो, पण राज ठाकरे यांनी दुसरे काही तरी बोलण्याची आवश्यकता होती. माझी आई देखील मला लाडाने ‘चंद्या’ म्हणते, तर हे सर्व विरोधक प्रेमापोटी ‘चंपा’ म्हणतात,असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तर ,आम्ही देखील त्यांच्या भाषेत उत्तर देऊ शकतो. पण आमची संस्कृती तशी नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील भाजपा व महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सभा पार पडली, यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

अजित पवार यांच्याकडून चंपा म्हटले गेले, त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील तसेच म्हटले. यातून शरद पवार साहेब सांगतील त्याप्रमाणे ते बोलणार हेच पुन्हा सिद्ध झाल्याचे सांगत, राज ठाकरे यांच्यावर पाटील यांनी निशाणा साधला. याप्रसंगी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, शहर अध्यक्षा व विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक तसेच शहरातील महायुतीचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: October 18, 2019 5:29 AM
Exit mobile version