आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी वीज चोरली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी वीज चोरली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

नागपूर – शिवसेना नेते आदित्य ठाकरे शनिवारी नागपूर दौऱ्यावर असताना ते उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला वीज चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेतर्फे आयोजित केलेल्या तान्हा पोळ्याच्या कार्यक्रमात वीज चोरी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – दसरा मेळाव्यासाठी परवानगी न देण्यामागे राजकीय दबाव, खासदार विनायक राऊतांचं सूचक वक्तव्य

नागपूरच्या नवीन सुभेदार लेआऊट परिसरात तान्हा पोळ्याचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिवसेना युवानेते आदित्य ठाकेही उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमासाठी व्यासपीठामागील विजेच्या खांबावरून वीज चोरी करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विजेच्या दोन खांबांमधून तारांवर आकोडे टाकून वीज घेण्यात आल्याचं या व्हिडीओमधून दिसत आहे. ही वीज चोरी आयोजकांनी केली की मंडप सेवा पुरवणाऱ्या पुरवठादाराने केली याबाबत चौकशी केली जात आहे.

हेही वाचा – दसरा मेळावा शिवसेनेचा आहे शिवसेनेचाच राहणार : आदित्य ठाकरे

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत गजानन परिसरात आले होते. त्यावेळी त्यांची सभा झाली होती. या सभेसाठीही जवळच्या खांबावरून वीज चोरी झाल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे याप्रकरणी महावितरणने आयोजकांवर दंड ठोठावला होता.

First Published on: August 28, 2022 12:25 PM
Exit mobile version