बुलडाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात राडा, शिंदे आणि ठाकरे गट भिडले

बुलडाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात राडा, शिंदे आणि ठाकरे गट भिडले

बुलडाणा- बुलडाण्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गटात राडा झाला. शिवसेना पक्ष प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनी बुलडाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी हा राडा झाला. घटनास्थळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. कार्यक्रमा स्थळी गोंधळ निर्माण झाला होता.

काय घडले –

शिंदे गटाच आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी हा राडा घातल्याचे समजते आहे. आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते शिवसेनेचा सत्कार सोहळा सुरु असताना कार्यक्रमाता घुसळ्याचे सांगितले जात आहे. संजय गायकवाड यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी सत्कार समारंभात घुसून पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाकडून जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आम्ही शिवसेनेचे लोक आहोत, असा दावा करत गायकवाडांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. पोलिसांसमोर दोन्ही गट भिडले. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत हा सगळा राडा शांत करण्याचा प्रयत्न केला.

नव्या नियुक्त्यांना आव्हान देण्यासाठी राडा ? –

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बुलडाण्यातील आमदार, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्या नियुक्त्या बुलडाण्यात करण्यात आल्या आहेत. या नव्या नियुक्त्यांना आव्हान देण्यासाठी हा राडा करण्यात आल्याची चर्चा सुरू होती. नुकतीत बुलडाण्याचे शिवसेना खासदार आणि आमदार आणि शिंदे गटाला समर्थन दिलेले सगळ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अवघ्या काही दिवसात बुलडाण्यात तुफान राडा झाला आहे.

First Published on: September 3, 2022 2:30 PM
Exit mobile version