घटनाबाह्य सरकारचा कोल वॉशरिजमध्ये घोटाळा; आदित्य ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र

घटनाबाह्य सरकारचा कोल वॉशरिजमध्ये घोटाळा; आदित्य ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र

नागपूर : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (aditya thackeray) सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. ते नागपूर विमानतळावर पोहचले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर कोल वॉशरिजचा घोटळा झाल्याचे आरोप केले आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मी मंत्री असताना नांदगाव आणि वाराडामध्ये येऊन गेलो. दोन्ही वेळेला येऊन गेल्यानंतर मी ऍशपोन्ड 65 टक्के क्लिअर केले. पण हे सर्व झाल्यानंतर आता असे ऐकू येते की, ऍश डिसपोसल सुरू आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांचे जीवन एकदमच खालावलेले आहे. सर्व ठिकाणी राख दिसत आहे, असा आरोप केला. यावेळी त्यांनी कोल वॉशरिजचा विषय मांडला. आदित्य ठाकरे म्हणाले की, कोल वॉशरिज विदर्भामध्ये वाढत चालल्या आहेत. मी मंत्री असताना हे सर्व थांबले होते. परंतु आताच्या घटनाबाह्य सरकारमध्ये कोल वॉशरिजचा एक घोटाळा समोर येत आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे अंजीवनचा मोठा प्रश्न आहे. अंजीवरवर याठिकाणचे स्थानिक लोक विषय मांडत आहेत, पण कोणी त्यांना ऐकत आहे का, हाही प्रश्न आहे. मी जेव्हा मंत्री होतो आणि महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा अंजीवनला देखील आम्ही स्थगिती देताना इंटर मोड सेशनला आम्ही विनंती केली होती की, शहराच्या बाहेर हा प्रकल्प जावा, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

दौऱ्याआधीच भावी मुख्यमंत्री पोस्टरबाजी
आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर येण्याआधीच रविवारी (21 मे) नागपूरच्या रामटेक आणि कन्हान येथील रस्त्यांवर आणि बस स्टॉपवर ‘भावी मुख्यमंत्री’ या आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यावर भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत, असा मजकूर दिला आहे. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे पोस्टर्स लावले असून या पोस्टर्सवर दोघांचेही फोटो लावण्यात आले आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही या पोस्टर्सवर फोटो आहेत. हे पोस्टर्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

First Published on: May 22, 2023 3:32 PM
Exit mobile version